नमस्कार!

तुम्हाला हे महित आहे का, भारतातील जवळपास ७५ दशलक्ष उपक्रमांपैकी केवळ ४% उपक्रम  महिलांच्या मालकीचे आहेत. जर महिला उद्योजकांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर  केला तर २०३० पर्यंत जवळपास १२.६ दशलक्ष महिला उद्योजक, १५०-१७० दशलक्ष अतिरिक्त कामगारांसाठी रोजगार निर्माण करु शकतात. असे झाल्यास २०३० पर्यंत जवळपास २५% पेक्षा जास्त तरुणांना त्या आपल्या उद्योगात रोजगार देवू शकतात.
 
वरील आकडेवारी पाहाता आपल्याला भारतातील महिला उद्योजकांची क्षमता व शक्तिची कल्पना येते. आणि आपण त्यापैकी एक आहात!
 
तरीही  हे कटु सत्य मान्य करायलाच पाहिजे की जागतिक अर्थव्यवस्थेच्या फोरमचे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२० नुसार १५३ देशांमध्ये भारताचा क्रमांक ११२ वा आहे. भारत, २०१८ पासून ४ आणि  २००६  पासून १६ स्थान खाली आहे.
 
भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांनी त्यांच्या योग्य ठिकाणी हक्क सांगण्यासाठी क्रांती करण्याची ची आवश्यकता आहे.
 
अशा क्रांतीस सक्षम करण्यासाठी आम्ही ४६ व्या शतकात साक्षरता, देखरेख, नेटवर्क व भांडवल ह्या चार  खांबावर अवलंबून असलेल्या महिला उद्योजकांसाठी एक सर्वसमावेशक अशी इको प्रणाली तयार करण्याचे  अभियान सुरु केले आहे.
 
ह्याचा अत्यंत  प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आपल्यास (अ) ज्या आव्हानांना आपण पेलले आहे किंवा ज्या आव्हानांना आपण सध्या तोंड देत आहात (ब) आपले मूळ प्रशिक्षण / कौशल्य विकास (क) प्रशिक्षणातील त्रुटी आणि  (ड) सध्या देत असलेल्या प्रशिक्षणाच्या  कार्यक्रमाविषयीआपल्या अपेक्षा ह्या विषयाची ओळख करून देवून हे आव्हान स्वीकारण्यास व त्यावर मात करण्यास मदत करू आणि आपल्याला सक्षम बनवू.
 
ज्या महिला उद्योजिका दीर्घ आणि सतत संघर्षानंतर यशस्विरित्या ह्यावर मात करून पुढे गेल्या आहेत त्यांनी  कृपया ह्या सर्वेक्षणात सहभाग घेवून भूतकाळातील आपला अमूल्य असा अनुभव आम्हाला सांगावा ही विनंती.
 
आम्ही आपल्याला खात्री देतो की आपली माहिती आणि आपल्या प्रतिसादावर मंथन केले जाईल आणि ते अत्यंत गोपनीय ठेवले जाईल. या व्यतिरिक्त आपले अनामिकत्व, आपले प्रतिसाद आणि गोपनीयता पुढे संरक्षित करण्यासाठी केवळ संशोधनाच्या उद्देशाने  इतरांसोबत  जोडले जातील आणि त्या अनुषंगाने संक्षिप्त अहवालात  त्याचा समावेश केला जाईल.
 
ह्या अनुषंगाने आम्ही आपणास विनंती करतो की खालील सर्वेक्षणासाठी आपण आपल्या अमूल्य अशा वेळेतून ३० मिनिटाचा अवधी आम्हाला द्यावा. आपण केलेल्या सहकार्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत .
 

Cheers !
Team 46xx
www.46xx.in
 
 
स्त्रोत:
1. Powering the economy with Her, Women Entrepreneurship in India, Report by Google and Bain & Company 2020
2. Global  Gender Gap Report  2020,World Economic Forum
 
5% of survey complete.

T